आज
आपण येणा-या २०१६ वर्षात मुदत विमा घ्यायचा झाल्यास कोणते चांगले पर्याय उपलब्ध
आहेत याचा आढावा घेणार आहोत.
या
आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे मुदत विमा किंवा टर्म प्लान हा विम्याचा सर्वात
बेसिक आणि स्वस्त पर्याय आहे. तसेच टेक क्रांतीमुळे आता घरबसल्या सर्वोत्कृष्ट
विमा खरेदी करणे सहजसोपे झाले आहे. सगळ्याच प्रमुख कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर
मुदत विमा ऑनलाइन खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध केला असून या योजना एरवी ऑफलाइन
खरेदी केल्या असता येणा-या खर्चापेक्षा तब्बल ३०-४० टक्क्यांनी स्वस्त आहेत.
त्यामुळे आज तुम्ही हा लेख वाचत असताना ऑनलाइन व्यवहारांचे प्राथमिक ज्ञान जर असेल
तर मुदत विमा हा ऑनलाइनच खरेदी करायचा हे निश्चित करून टाका.