Tuesday 29 December 2015

परिचय...

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो...

ब्लॉगर विश्वातली ही माझी दुसरी इनिंग.. 

माझ्याबदद्ल सांगायचं तर मी एक अस्सल मुंबईकर मराठमोळा तरूण. सध्या वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत आहे.

काही तांत्रिक कारणांनी मला माझं नाव मात्र गुलदस्त्यातच ठेवणं भाग आहे. त्याबद्दल क्षमस्व!

नोकरी निमित्ताने बॅंकिंग आणि फायनान्सचा खूप जवळून परिचय झालाय किंवा होतोय. त्यापैकी माझा सर्वात जास्त जिव्हाळ्याचा विषय ठरलाय तो म्हणजे "पर्सनल फायनान्शियल प्लानिंग".

इंग्रजीत पर्सनल फायनान्शियल प्लानिंग या विषयाला वाहिलेले अनेक ब्लॉगर्सतज्ञांचे ब्लॉग पाहण्यात आले. मात्र दुर्दैवाने मराठीत मात्र असा कोणताच ब्लॉग सापडला नाही. त्यामुळे ब-याच दिवसांपासून हा असा ब्लॉग लिहिण्याची इच्छा होती. अखेर आज शुभारंभ करतोय. माझ्याजवळ असलेल्या माहितीचा किंवा कौशल्याचा जास्तीत जास्त लोकांना उपयोग व्हावा व आपल्या समाजात आर्थिक साक्षरता वाढावी हा एकमेव उद्देश या ब्लॉगमागे आहे.



पर्सनल फायनान्स.. किंवा व्यक्तिगत आर्थिक नियोजन हा माझ्या मते आपल्या देशात खूपच दुर्लक्षित असा विषय राहिलेला आहे. खासकरून आपल्यासारख्या मराठमोळ्या मध्यमवर्ग किंवा नवमध्यम वर्गात. त्यामुळे या माध्यमातून या विषयाची किमान तोंडओळख करून देण्याचा माझा प्रयत्न असेल.

अर्थात आर्थिक नियोजनासंबंधीची जाणीव प्रबळ करणेअर्थसाक्षरता पसरवणे हा एकमेव उद्देश या ब्लॉगमागे असल्याने या ब्लॉगमधील लेख अगदी १०० टक्के पारदर्शी आणि अनबायस असतील याची खात्री बाळगा. यातून कोणत्याच एका विशिष्ट कंपनी किंवा प्रोडक्टचा पुरस्कार केला जाणार नाहीये किंवा तसं करण्यात माझे कोणतेच वैयक्तिक हितसंबंध नसतील.


शक्य तितका वेळ काढून जास्तीत जास्त अद्ययावत माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल.. आपले अभिप्रायशंकासूचना नक्की कळवत रहा. तीच या लिखाणाची प्रेरणा ठरेल. धन्यवाद!

No comments:

Post a Comment